आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ड्वेन ब्रावो निवृत्त

टीम महाराष्ट्र देशा- धडाकेबाज फलंदाजी आणि गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांची पिसे काढणारा वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली आहे. ब्रावो हा गेली 14 वर्षे वेस्ट इंडीजच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. भारताविरुद्ध सुरु असणाऱ्या मालिकेसाठी निवड न झाल्याने तो नाराज होता. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डासोबत वाद झाल्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारल्याचे बोलले जात आहे. ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये तो खेळणार असल्याचं सांगितलं जातंय.

एका वृत्तवाहिनींना दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्राव्होने म्हटले आहे की, आज मी क्रिकेट जगताला सांगू इच्छूतो मी सर्व आंतरराष्ट्रीय सर्व खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. चौदा वर्षापूर्वी मी वेस्ट इंडिजसाठी क्रिकेटच्या मैदानावर पाय ठेवला. लॉर्डस मैदानामध्ये इंग्लंडविरूद्ध २००४मध्ये मरून रंगाची टोपी परिधान करून मैदानात उतरलो होतो. त्यावेळचा माझ्यातीन उत्साह आणि मिळालेली प्रेरणा संपूर्ण करिअरमध्ये माझ्या सोबत राहील.

ड्वेन ब्रावोची कारकीर्द

कसोटी क्रिकेट

सामने धावा सरासरी बळी
४० २२०० ३१.४२ ८६

सर्वोत्तम कामगिरी ; ५५ धावांत ६ बळी

एकदिवसीय क्रिकेट

सामने धावा सरासरी बळी

१६४ २,९६८ २५.३६ १९९

सर्वोत्तम कामगिरी ; ४३ धावांत ६ बळी

टी२०

सामने धावा सरासरी बळी

६६ १,१४२ २४.२९ ५२

सर्वोत्तम कामगिरी ;२८ धावांत ४ बळी