आज छत्रपती शिवाजी महाराज भाजपला ‘भलते’ वाटू लागले – आमदार जयंत पाटील

नागपूर – छत्रपतींचे नाव घेवून भाजप सत्तेवर आले आणि मोठे झाले आणि आज छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला ‘भलते’ वाटायला लागले. यातच तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला फसवत आहात हे सिध्द झाले आहे असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी मिडियाशी बोलताना केला.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या उंचीबाबत विषय निघाला असता त्यांनी हा काय भलता विषय काढता असे विधान केले. त्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले.आमदार अतुल भातखळकर नेहमी सभागृहात मधेमधे बोलत असतात. कुणीही बोललं तरी त्याला अडवणार त्यांच्या विरोधात बोलणं हाच उदयोग ते करत असतात. त्याबद्दल सभागृहातील सदस्यांमध्ये त्यांच्याविषयी रागही होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही डिझाईन केला. छत्रपतींच्या पुतळयाचा विस्तार आम्ही नीट तयार केलेला आहे. एवढी काळजी घेतली आहे की जगाच्या पाठीवर छत्रपतींच्या पुतळयाइतका कुणाचाही पुतळा असू नये. मात्र शेजारी राज्यात सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाची उंची कमी करण्याचं पाप भाजप सरकारने केले आहे असा आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला.कोणत्याही वादळी वाऱ्याला तोंड देईल अशी रचना आणि डिझाईन आम्ही छत्रपतींच्या पुतळयाची तयार केली होती आणि आज मुख्यमंत्री सभागृहात वादळी-वाऱ्याला तोंड देण्यासाठी पुतळयाची उंची कमी केली आहे असे सांगत आहेत. हे धादांत खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत. लोकांना फसवण्याचे काम करत आहेत आणि लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवण्याचे काम करत आहेत.

या महाराष्ट्रात आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना आमचं स्वप्न होतं की, महाराजांचं स्मारक हे जगातील सर्वोच्च असलं पाहिजे आणि त्यापध्दतीचे डिझाईन आम्ही तयार केले होते. मात्र ते डिझाईन बदलून त्या पुतळयाची उंची कमी केली जात आहे. उंची कमी करताना जगातील सर्वात उंच स्मारक असेल तर आम्ही समजू शकतो. परंतु नरेंद्र मोदींचा राग सहन होणार नाही म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकापेक्षा उंची कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय अशी शंकाही आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

पाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

राजदंड पळविणे हा शिवसेनेचा ‘स्टंट’ – विखे पाटील

 

You might also like
Comments
Loading...