आमदार तुकाराम कातेंवरचा हल्ला ‘या’ शिवसैनिकाने परतवून लावला

'आपल्या धमन्यांमध्ये भगवं रक्त सळसळत असून हा हल्ला होत असताना षंढासारखा बघत बसू शकतच नव्हतो'

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर रात्री जीवघेणा हल्ला झालाय. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यातून आमदार तुकाराम काते थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यात तुकाराम कातेंच्या सुरक्षारक्षकासह 2 कार्यकर्ते जखमी झालेत.

शुक्रवारी महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो कारशेडचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले. तेथून परतत असतानाच काते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र नगर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे त्रास होतो अशी स्थानिक रहिवाशांची तक्रार होती. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीही काम थांबवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. मेट्रोच्या कंत्राटदारांनेच हल्ला घडवून आणल्याचा आरोप काते यांनी केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून काते बचावले असले तरी त्यांचे सुरक्षारक्षक आणि अन्य दोन सहकारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा हल्ला करणाऱ्यांना काते यांच्यासोबत असलेल्या एका जिगरबाज शिवसैनिकामुळे पळून जावं लागलं. हल्लेखोरांना निधड्या छातीने सामोऱ्या गेलेले किरण सावंत हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. आपल्या धमन्यांमध्ये भगवं रक्त सळसळत असून हा हल्ला होत असताना षंढासारखा बघत बसू शकतच नव्हतो अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.

जवळपास ५ त ६ हल्लेखोरांनी काते यांच्यावर हल्ला केला होता. किरण सावंत यावेळी काते यांच्यासोबतच होते, त्यांनी काते यांचा बचाव करण्यासाठी स्वत:च्या हाताची ढाल केली आणि काते यांना साधा ओरखडाही येऊ दिला नाही. ‘मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला शिवसैनिक आहे, चांगल्या व्यक्तीसाठी माझा प्राणही गेला तरी ते वाया जाणार नाही’ अशा शब्दात या शिवसैनिकाने प्रतिक्रिया दिली आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...