भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार

amit shaha narendra modi

टीम महाराष्ट्र देशा:
लोकसभा निवडणूक २०१९ साठी भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत भाजपाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महिला आघाडीच्या विजया रहाटकर उपस्थित असतील.
या बैठकीत उत्तर प्रदेश व बिहारसह महाराष्ट्रात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. देशात बऱ्याच ठिकाणी भाजपचे उमेदवार निश्चित आहेत त्यांच्याही नावाची घोषणा होवू शकते.
उत्तर प्रदेशात भाजपचे ७१ खासदार आहे त्यातील बऱ्याच जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचार आहे. महाराष्ट्रात सोलापूर व अहमदनगर सोडता इतर ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत कोणत्या उमेदवारांचा समावेश होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.