राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी

टीम महाराष्ट्र देशा : आज राजमाता जिजाऊंची ४२१ वी जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे तोबा गर्दी जमली आहे. आज सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राजमाता जिजाऊ जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १५९८ मध्ये झाला. हा भव्यदिव्य राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर महामार्गजवळ आहे. याच वस्तूसमोर नगरपालिका निर्मित एक बगीचादेखील आहे. येथेच समोर राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे.

सिंदखेडराजा येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. यामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरिहाराचे शिल्प आहे. राजे लखुजीराव जाधव यांनी मंदिराचे पुर्नजीवन करून शिलालेख कोरलेला आहे.

You might also like
Comments
Loading...