आज सैन्य दिनी भारताच्या लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला खडसावले

Bipin Rawat

नवी दिल्ली: दहशतवाद्यांचे दहशतवाद्यांचे नंदनवन अशी ओळख असलेल्या पाकिस्तानने भारताला आता थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. पाकिस्तान अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी देतोय असे जर भारताला वाटत असेल तर भारतावर आम्ही हल्ला करून अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देऊ असे ट्विट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आसिफ ख्वाजा यांनी केले होते. त्यावर बोलतांना भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत आणि दहशतवाद्यांना मदत करण्याचे सुरूच ठेवले तर नाईलाजाने भारतीय लष्कर त्यांच्याविरोधात सगळ्यात मोठी कारवाई करेल.

आज सैन्य दिनाच्या दिवशी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्ताना ला खडसावत पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. तसेच घुसखोरांना, दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून वेळोवेळी मदत केली जात असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याला आम्ही प्रत्यत्तुर दिलेच आहे. मात्र असेच सुरू राहिल्यास पाकिस्तानविरोधात आणखी कडक धोरण अवलंबले जाईल. तसेच भारताचे जवान देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतात. मात्र आता सोशल मीडियावरून अनेकप्रकारे सैन्याच्या विरोधात माहिती प्रसिद्ध केली जाते. सोशल मीडियाचा वापर योग्यपद्धतीनेच केला जाईल, यासंदर्भात काळजी घेण्यास सांगितले आहे.

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...