पुणे : पुणे शहरात आज नव्याने २५० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८५ हजार २८५ इतकी झाली आहे. शहरातील २२२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७३ हजार ५३५ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ८ हजार ४०३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख २५ हजार ०७८ इतकी झाली आहे.
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३ हजार ०३० रुग्णांपैकी २२४ रुग्ण गंभीर तर ३६१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७२० इतकी झाली आहे.
दरम्यान राज्यात आतापर्यंत १ लाख ३१ हजार २०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६४,४६,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५१,८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५२,७०२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती’ ; अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख
- आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना
- मुंबई गुन्हे शाखेचे पथक राज कुंद्राला घेवून पोहचले थेट शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- दहावीनंतर आता प्रतिक्षा बारावीच्या निकालाची, औरंगाबाद विभागातील ४२ टक्के काम पूर्ण!