नव्या मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज होणार सादर

टीम महाराष्ट्र देशा :  मोदी सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अर्थ संकल्प सादर करतील.

सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील. येत्या काळात महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच बँकिंग क्षेत्रातील काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक सर्वेक्षण (आर्थिक पाहणी अहवाल) सादर केला होता. या आर्थिक पाहणी अहवालात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेसंदर्भात सरकारची दिशा आणि धोरण स्पष्ट केलं आहे. त्यानुसार विकास दर सात टक्के राहण्याची आशा आहे.