fbpx

कुलभषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी उद्या पाकिस्तानला जाणार

kulbhushan jadhav

टीम महाराष्ट्र देशा : हेरगिरीच्या प्रकरणात पाकिस्तानने अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भेटन्यसाठी त्यांची आई व पत्नी उद्या पाकिस्तानला जाणार आहेत. व्यावसायिक विमानाने त्या दोघिही पाकिस्तानला रवाना होतील व उद्याच परत भारतात परतील. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. यावेळी पाकिस्तानातील भारतीय उप-उच्चायुक्त जे.पी सिंग देखील बरोबर असतील.

20 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने व्हिसा जारी केला होता. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झाला. हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती.