गुटखाविक्री करणाऱ्यांविरोधात कायदे कडक करणार- गिरीश बापट

मुंबई, दि. 7- गुटखा विक्री करणे हा अजामिन पात्र गुन्हा ठरावा तसेच यासाठीचे कायदे अधिक  कडक व्हावेत यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.

श्री. बापट पुढे म्हणाले, राज्यात गुटखाबंदी कायदा आहे. राज्यात सन 2012-13 पासून आतापर्यंत परराज्यातून येणारा सुमारे 114 कोटी 20 लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. सुगंधी सुपारी किंवा गुटखाबंदी लागू असताना सातत्याने राज्यात हे पदार्थ येत आहेत. याबाबतीत कोणी अधिकारी कर्मचारी मदत करत असतील तर त्यांची चौकशी करण्यात येईल.

उपरोक्त संदर्भातील लक्षवेधी सदस्य धनंजय मुंडे यांनी उपस्थित केली होती.

You might also like
Comments
Loading...