Bhaskar Jadhav। “फार बुद्धिमान माणसांच्या टीकेला…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं दिलेल्या निवडणूक चिन्हावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंना मिळालेली निशाणी मशाल नव्हे तर आईस्क्रीमचा कोन आहे, अशा शब्दांत राणेंनी घणाघाती टीका केली आहे. त्यावर भास्कर जाधवांनी नितेश राणेंना एका वाक्यात उत्तर प्रत्युत्तर दिले आहे.

फार बुद्धिमान माणसांच्या टीकेला माझ्याकडून उत्तर अपेक्षित करू नका असे म्हणत नितेश राणे यांच्या मशाल या निशाणीच्या चिन्हावर केलेल्या टीकेला भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) उत्तर दिले आहे. याशिवाय जाधव यांनी राष्ट्रपती यांची मी नक्कल केलेली नाही आणि नक्कल केली म्हणून कोणी सिद्ध करू शकणार नाही असं देखील भास्कर जाधव म्हणालेत. ही नक्कल असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे असा दावाही त्यांनी केला आहे.

त्यापुढे जाधव म्हणाले मी नक्कल किरीट सोमय्या यांची नक्कल केली, त्यामुळे कळत नकळत पणे किरीट सोमय्या यांची तुलना राष्ट्रपती यांच्याशी केली जातेय. देशाच्या राष्ट्रपती यांचं नाव घेणे काही गुन्हा आहे का? असाही सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे. गुन्हा दाखल करणारेच राष्ट्रपतींचा अवमान करतात असे म्हणून भास्कर जाधवांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. यानंतर त्यांनी नितेश राणेंच्या टिकेला फार बुद्धिमान माणसांच्या टीकेला माझ्याकडून उत्तर अपेक्षित करू नका असे म्हणत एका वाक्यामध्ये प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे यांनी मशाल चिन्हावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात भास्कर जाधव यांनी बोलणं टाळलेलं पाहायला मिळालं.

 काय म्हणालेत नितेश राणे?

प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला देण्यात आलेल्या नव्या चिन्हासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी ही मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला ठाकरे गटाला लगावला. तसेच हे चिन्ह उद्धव ठाकरेंना का देण्यात आलं यासंदर्भातील कारणही त्यांनी सांगितलं. “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले. “मशाल नाहीच आहे की आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे,” असंही नितेश राणेंनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या:

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं दिलेल्या निवडणूक चिन्हावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सडकून टीका …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics