सरकारवर निशाना साधताना राहुल गांधी पडले पुन्हा एकदा तोंडघशी

rahul_gandhi

टीम महाराष्ट्र देशा – नोटाबंदीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधींनी ज्या वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो वापरला, त्या व्यक्तीशी प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी नोटाबंदीच्या निर्णयावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया वृद्ध व्यक्तीने दिल्याने कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अक्षरशः तोंडघशी पडले आहेत. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना कसा फटका बसला, हे दाखवण्यासाठी राहुल गांधींनी हे ट्विट केले आहे. मात्र राहुल गांधींनी ज्या वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो ट्विट केला आहे, ती व्यक्ती नोटाबंदीच्या निर्णयाने आनंदी असल्याचे आता समोर आले आहे.

ज्या वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो ट्विट केला आहे त्या व्यक्तीचे नाव नंदलाल असून, ते लष्करातून निवृत्त झाले आहेत. नंदलाल गुरुग्राममध्ये एका भाड्याच्या घरात राहतात. ‘सरकारने घेतलेले निर्णय देशाच्या भल्यासाठीच असतात. त्यामुळेच माझा सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा आहे,’ असे नंदलाल यांनी म्हटले.नंदलाल यांनी पत्रकारांशी बोलताना बँकेसमोरील रांगेत उभे राहण्याचे कारणदेखील सांगितले. ‘मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू आले नव्हते. तर बँकेसमोरील रांगेत उभे असताना एका महिलेने पायावर पाय दिल्याने डोळ्यात पाणी आले होते,’ असे नंदलाल यांनी सांगितले. याआधीही राहुल गांधींनी नोटाबंदीच्या निर्णयावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता.

1 Comment

Click here to post a comment