जेऊर रेल्वे स्टेशनवर उद्यान एक्सप्रेसला थांबा द्यावा;जेऊर व्यापारी संघटनेची मागणी.

जेऊर- करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्टेशनवर उद्यान एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा अशी मागणी जेऊर व्यापारी संघटनेने केली आहे.दुपारी ३.३० वाजता सोलापूर- पुणे इंद्रायणी एक्सप्रेस पर्याय होता परंतु रेल्वेच्या काही कामानिमीत्त १ नोव्हेंबर पासून पुढील तीन महिने ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे.त्यामुळे उपाय म्हणून दुपारची उद्यान एक्सप्रेसला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी होत आहे.

जेऊर हे १५ हजार लोकसंख्याचे गाव असून जेऊर येथे मध्ये रेल्वेस्टेशन आहे. जेऊरला जवळजवळ ३० ते ४० गावे जोडली गेलेली आहेत. मुंबई-पुणे-हैद्राबाद-बेंगलोर-चेन्नई ला जाण्यासाठी हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. परंतु प्रवाशांच्या संख्येच्या प्रमाणात रेल्वे गाड्या थांबत नसल्यामुळे येथील परिसरातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.सध्या जेऊर वरून पुण्याला जायचे झाले तर सकाळी ६ वाजता हैद्राबाद- मुंबई एक्सप्रेस आहे त्यानंतर दिवसभर एक ही गाडी नसून संध्याकाळी ७ वाजता विजापूर- मुंबई ही पँसेंजर आहे, जवळजवळ १३ तास एक ही रेल्वे गाडीचा थांबा जेऊर रेल्वे स्टेशनवर नसल्यामुळे येथील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.इंद्रायणी एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे जेऊरकरांच्या समस्या आणखीनच वाढलेल्या आहेत.इंद्रायणी एक्सप्रेस सुरू असताना जेऊर रेल्वे स्टेशनचे रोजचे उत्पन्न ७० ते ८० हजार होते परंतु ही गाडी रद्द करण्यात आल्यामुळे सध्याचे उत्पन्न २५ ते ३० हजारांवर गेलेले आहे.
पहा व्हिडीओ