मध्य मतदार संघातील वीज समस्यांच्या निरसनासाठी आ. जैस्वालांचे उर्जा मंत्र्यांना साकडे

औरंगाबाद : मध्य विधानसभा मतदार संघातील वीज समस्यांचे निवेदन आ. प्रदीप जैस्वाल यांनी शुक्रवारी उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले. निवेदनाद्वारे समस्या आणि काही उपाय योजना त्यांनी उर्जा मंत्र्यांसमोर मांडल्या.

मध्य मतदारसंघात जूने औरंगाबाद, एकतानगर, जटवाडा रोड, हर्सुल, भगतसिंगनगर, पिसादेवी रोड, सुरेवाडी या भागात नविन वसाहती तयार झालेल्या असून या वसाहतीत विजेचा दाब कमी जास्त झाल्यावर वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे या भागात नविन विज उपकेंद्र मंजूर करणे आवश्यक आहे. तसेच या नविन वसाहतीमध्ये नविन डिपी व विद्युत पोल मंजूर करणेही आवश्यक असल्याचे सांगत विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये करिता काही कामेही त्यांनी यात सुचवली आहेत.

जटवाडा रोड व भगतसिंगनगर या भागात नविन वसाहतीकरिता मनपा वॉटर फिल्टर, जटवाडा रोड व संगोपन केंद्र हर्मुल किंवा हर्सुल कचरा डेपो येथील जागी नविन उपकेंद्र मंजूर करावे. तसेच मतदारसंघातील हडको भागातील एन-१, एन-१०, एन-११, एन-१२, एन-१३ मधील विविध सेक्टरमध्ये असलेल्या गल्ल्या अरुंद असून महावितरणच्या लघु व उच्च दाबाच्या वाहीन्या लागून गेलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला असल्याने या भागात नविन एबी केबल वाहिन्या टाकण्यात याव्यात. शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग राजाबाजार येथील संस्थान गणपती पासुन, सराफा, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, औरंगपुरा या भागात व्यवसायीकांची दुकाने असून या भागातून श्री गणेश उत्सव मिरवणुक, छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक आदी उत्सव मिरवणुका जात असून या रस्त्यावर उच्च दाबाची वाहीनी व लघु दाबाच्या वाहीनी असल्याने अनेकवेळा गैरसोय होत असते. त्यामुळे या भागात भूमिगत उच्च दाबाची व लघु दाबाची वाहीनी टाकणे, असे विविध उपाय नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

IMP