घाटी रूग्णालयात वीज बचतीची यंत्रणा बसवणार

औरंगाबाद  : घाटीरुग्णालयात वीज बचतीसाठी लवकरच यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये 25 ते 50 टक्के ऊर्जा बचतीला वाव आहे, असे समोर आले होते. त्यानुसार महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडून 25 लाख रुपयांचा निधी महिन्यांपूर्वीच मंजूर झाला होता. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

शिवाय वीज यंत्रणा दुरुस्ती, नूतनीकरणासाठी 25 लाख 26 हजार रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यात 50 लाख रुपये खर्चून एलईडी दिवे तसेच सौर ऊर्जा उपकरणे लागणार आहेत.