‘तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावलं, हे सांगणं म्हणजे भाबडेपणा’

‘तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावलं, हे सांगणं म्हणजे भाबडेपणा’

मुंबई : मुख्यमंत्रिपदाबाबत राज्याच्या राजकारणात मोठा वाद सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध भाजपमध्ये हा वाद सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर पक्षातील इतर नेत्यांना पुढं करायचं होतं. असं सांगत हा वाद सुरु झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर तुफान टोलेबाजी केली आहे. शरद पवारांनीही त्याच मद्द्याला धरुन फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले हे सांगितलं.

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनायला तयार नव्हते. मी त्यांचा हात वर केला. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजावाला संधी द्यावी यासाठी मी त्यांचा हात वर केला आणि म्हणालो हेच मुख्यमंत्री होतील. हातातली सत्ता गेली म्हणून फडणवीस असे आरोप करतात. सत्ता गेल्याचं दुख त्यांना आवरेनासं झालंय, असं शरद पवार म्हणाले. त्यावर आता फडणवीसांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी थेट द्वापारयुगातील कथेचं उदाहरण देत मुख्यमंत्री आणि शरद पवारांवर टीका केली आहे.

द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!, असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या