fbpx

नगरसेवकाची लायकी काढल्याने कार्यकर्त्याने थेट अधिकाऱ्याला फणकावले

pune mahapalika125

पुणे: जलपर्णी नसताना देखील पुणे महापालिकेने २३ कोटींची निविदा काढण्याचा चालवलेला प्रताप सध्या पुणे शहरात गाजत आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्या नगरसेवकाने अधिकारी चोऱ्या करतात, म्हणताच तुमचा लायकी काय असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्याला कार्यकर्त्याने कानाखाली काढल्याची घटना पुणे महापालिकेत घडली आहे.

जलपर्णी नसताना देखील पुणे महापालिकेने आठ्पठ अधिक दराने २३ कोटींची निविदा काढण्याच्या प्रकार दोन दिवसांपूर्वी उजेडात आला होता. या प्रकरणी जाब विचारत कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून महापौर दालनात आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी अधिकारी चोऱ्या करतात, असा आरोप केला. यावर चिडलेल्या अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी तुमचा लायकी म्हणत नगरसेवकांना टार्गेट केलं. दरम्यान निंबाळकर यांनी उलट उत्तर देताच एका कार्यकर्त्याने त्यांच्या श्रीमुखात लगावली.

महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोर घडलेल्या या प्रकरामुळे गोंधळ उडाला. वातावरण अधिक तापताच सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना बाहेर नेले. घडल्या प्रकरामुळे महापौर टिळक यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, जलपर्णी काढण्याची निविदा रद्द करत चोवीस तासात चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले.