कंगनाविरोधात अटक वॉरंट काढणार; न्यायालयाने खडसावले

kangna rnavat

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडते. कंगणा तिच्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. कंगनाने एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरच आक्षेप घेत प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात अंधेरीच्या न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

यावर अंधेरी कोर्टात आज सुनावणी पार पडली. मात्र यावेळी कंगना उपस्थित नसल्याने कोर्टाने संताप व्यक्त करत पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आता २० सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात याचिका केली असून न्यायालयाने नियमबाह्य पध्दतीने कारवाई केली, असा आरोप याचिकेत केला होता. मात्र, न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे. न्या. डेरे यांनी यावर निकाल जाहीर केला होता तेव्हा कंगनाला न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नसून याचिका नामंजूर केली होती. यानंतर कंगनाने न्यायालयात हजेरी लावणे आवश्यक आहे.

कंगनाला कोरोनाची लक्षणं आढळली असून कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप रिपोर्ट आलेला नाही अशी माहिती तिचे वकील रिझवान सिद्दिकी यांच्याकडून देण्यात आली. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला. यावर भारद्वाज यांनी गेल्यावेळी देखील कंगना पुढील सुनावणीस उपस्थित राहील सांगत गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे येत्या २० तारखेला देखील कंगना उपस्थितीत राहीली नाही तर तिच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या