प्रत्येकाचा आधार बनून काम करण्याचा आपला प्रयत्न – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ‘सेवा आपल्या दारी ‘ उपक्रमातंर्गत पांच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचा मोफत लाभ मिळवून देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डाचे वाटप पंकजा मुंडे यांच्या हस्ते रविवारी अक्षता मंगल कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, माझे राजकारण हे वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतील सर्व समाज घटकांना आधार देण्याचा विचार पुढे घेऊन जात असताना प्रत्येकाचा आधार बनून काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या, आयुष्मान भारत सारख्या अनेक कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्याने भाजपला सर्व सामान्य जनतेचे आशीर्वाद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘जन आशिर्वाद यात्रा’ सुरु आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ सुरु आहे. सेना-भाजपच्या यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची ‘शिवस्वराज्य यात्रा’ ही रयतेचा आवाज बुलंद करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

#पक्षांतर : ईडी’च्या चौकशीची भीती दाखवून पक्ष प्रवेश घडवले जात आहेत : जयंत पाटील

माझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे

राधाकृष्ण विखे पाटलांनी योग्य मार्ग दाखवला, म्हणून मी भाजपात : पिचड

आघाडीला सुरुंग : 20 आमदार माझ्या संपर्कात – महादेव जानकरांचा गौप्यस्फोट