‘भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना’

Prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना, करण्यात आली आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Loading...

मिलिंद पखाले यांनी भारिप बहुजन महासंघप्रणित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच राजकारणावर टीका केली. ते म्हणाले, राज्यात काहीही ताकद नसताना ४७ जागी उमेदवार उभे करून वंचित बहुजन आघाडीने आरएसएस व भाजपला सरळ व स्पष्ट पाठिंबा दिला आहे.

तसेच आंबेडकरी जनतेसह वंचित बहुजनांची मते कुजवण्याचे काम यातून झाले आहे. वंचित हे नवे लेबलही आम्हाला मान्य नसल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pULoading…


Loading…

Loading...