‘…एक असा जोडीदार असणं’, कोहलीने केलं बायको अनुष्काचं तोंडभरुन कौतुक

अनुष्का शर्मा

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मानला जातो. तर पत्नी अनुष्का शर्मा देखील अभिनयाच्या क्षेत्रात टॉपची अभिनेत्री आहे. विराट-अनुष्का नेहमी एकमेकांची प्रसंशा करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अशातच एका पॉडकास्टमध्ये मार्क निकोलस यांच्यासोबत केलेल्या चर्चा सत्रात विराटने अनुष्काचे भरभरुन कौतुक केले आहे.

निकोलस यांनी विराटला प्रश्न विचारला की, मैदानावर असताना तू तणाव कसा कमी करतो? याबद्दल बोलताना विराटने म्हटले की, “या बाबतीत ७० टक्के तुमची टेकनिक असते तर ३० टक्के तुमचा माईंड गेम असतो. जेव्हाही खेळण्याची गोष्ट येते, तेव्हा माझ्या चांगल्या कामगिरीमागे अनुष्का एका मजबूत स्तंभाप्रमाणे उभी राहिली आहे. ती माझा आभारस्तंभ आहे”

अनुष्काबद्दल पुढे तो म्हणाला, “तीसुद्धा तिच्या क्षेत्रात त्या उचींवर आहे, जिथे तिला देखील नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो. यामुळेच ती माझी स्थिती समजू शकते. एक असा जोडीदार असणं, ज्याला माहीत असतं तुमच्या मनात काय सुरू आहे, तुम्ही काय अनुभवत आहात आणि कुठल्या परिस्थितिचा तुम्ही सामना करत आहात, ही फार चांगली बाब आहे.”

महत्वाच्या बातम्या