मुंडे-मेटे वाद पेटला! व्यसनमुक्ती संमेलन रद्दचा छडा लावण्यासाठी थेट न्यायालयात जाणार

Pankaja munde and mete (1)

बीड : ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे पुन्हा एकदा आमने-सामने पाहायला मिळाले.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंनी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन बीडला दिले. या
संमेलनाचे विनायक मेटे स्वागताध्यक्ष होते तर पंकजा मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मेटे यांना श्रेय मिळू नये म्हणून भाजप कार्यकर्ते प्रयत्नात असल्याची चर्चा होती.

भाजपने काढलेल्या आवाहनांच्या पत्रकांमध्ये, बॅनरवरून मेटेंचेच नाव आणि फोटो गायब केले होते. यामुळे आयोजनावर टीका करण्यात आली. त्यानंतर आचारसंहितेच कारण देत थेट संमेलन रद्दची घोषणा केली. दरम्यान, संमेलन रद्द करण्यामागे षडयंत्र असल्याच्या आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. संमेलन रद्दचा छडा लावण्यासाठी थेट न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

काहीदिवसांपूर्वी आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा दिसून आले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सदस्यांनी समाजकल्याण विभागांतर्गत विविध विकास कामांच्या निधीच्या वाटपा संदर्भात मतदान घ्या, असा ठराव मांडला. याला सत्तेत असलेल्या शिवसंग्रामच्या सदस्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले होते.