सैन्यातील भ्रष्टाचार हटवण्यासाठी मोदींच्या विरोधात लढणार, बीएसएफच्या ‘त्या’ जवानाची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा: भारत पाकिस्तान सीमा असणाऱ्या एलओसीवर तैनात सैनिकांना हलक्या दर्जाचे अन्न पुरवले जाते, अशी तक्रार करणारा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता, बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांनी तो व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला होता. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच यादव यांना बडतर्फ करण्यात आले होते, यानंतर आता तेजबहादूर यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

सैन्यातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचं यादव यांनी घोषित केले आहे, तसेच मी सेवेत असताना भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडल्याने बडतर्फ करण्यात आले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मोदी लढत असलेल्या वाराणसी मतदारसंघातूनच आपण लढणार असल्याचं देखील तेजबहादूर यादव पत्रकारांशी बोलताना यांनी सांगितले.

मोदी के सत्ता में आने के बाद भ्र्ष्टाचार के खिलाफ आवाज उठाई थी लेकिन उसकी सजा मुझे नौकरी से बर्खाश्त करके इस सरकार ने…

Fauji Tej Bahadur ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 30, 2019

बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार केल्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांचे तेजबहादूर यादव चर्चेत आले होते. 2017 साली हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यानंतर बेशिस्तीच्या आरोपाखाली त्याला बडतर्फ करण्यात आले होते. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मी भारतीय लष्करातील भ्रष्टाचार समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मात्र त्याबदल्यात मला नोकरीतून काढून टाकण्यात आले, अशी भावना यावेळी यादव यांनी बोलून दाखवली.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...