सध्याच्या सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव : भुजबळ

मुंबई : सध्याच्या सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव असून मागासवर्गीयांच्या जागा कमी केल्या जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरकावर निशाणा साधला. हा डाव यशस्वी होऊ देऊ नका असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कुणालाही न घाबरण्याचा सल्लाही दिला. लोकांच्या मदतीसाठी उभे राहा, स्वतःला झोकून द्या असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.आंदोलन करण्याच्या आधी डगमगून जाऊ नका. तुरुंगात गेलो तर सोडवतील कसे याची चिंता बाळगू नका लोकांचे प्रश्न हिरिरीने मांडा तर लोक तुम्हाला साथ देतील असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. मुंबईत अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लोकांना सहकार्य करा असेही आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

तरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्टेजवर जाणार – छगन भुजबळ

मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली