परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर बोलवा, देशात आणीबाणी लागू करा : ऋषी कपूर

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करावी, अशी मागणी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे. देशात कोरोनाच संसर्ग वाढत आहे, तरीही नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. देशात अशीच परिस्थिती कायम राहिली तर हे संकट अधिक गंभीर होईल.या उद्देशाने या ऋषी कपूर यांनी सातत्याने कोरोना संसर्गाविषयी आणि त्या परिस्थितीत सुरु असलेल्या उपाययोजनांवर आपली मतं ट्विटद्वारे मांडली आहेत.

“आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? म्हणूनच आपल्याला सैन्याच्या मदतीची गरज आहे,त्यमुळे लष्कर बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असं मी म्हणतो आहे. आणीबाणी.” असं ट्विट करत ऋषी कपूर यांनी आपली भूमिका मांडली आहे. यापूर्वीही दरम्यान, ऋषी कपूर यांनी सरकारकडे किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली होती. कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती.

ऋषी कपूर म्हणाले होते, “सरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितता आहे. पोलिस, डॉक्टर आणि नागरिकांना ताण कमी करायचा आहे. तशीही काळ्याबाजारात दारुची विक्री सुरुच आहे. सरकारलाही उत्पादन शुल्काचा (एक्साईज) पैसा हवाच आहे. उद्विग्नतेसोबत नैराश्यही द्यायला नको. तसेही लोक पीत आहेतच, तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. बघा विचार करा.”

दरम्यान, पत्रकार मधू तेहरान यांचं एक ट्विट रिट्विट करत त्यांनी देशभरात सुरु असलेल्या बनावट आणि अस्वच्छ मास्कच्या उत्पादनावरही बोट ठेवलं होतं. तेहरान यांनी काही ठिकाणी मास्कचं अत्यंत निकृष्ठपणे होणाऱ्या मास्क उत्पादनाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काही लोक बनावट मास्क, बनावट कोरोना चाचणी किट, तपासणी न केलेले व्हेंटिलेटर बाजारात विकत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. तसेच यावर सरकारचं नियंत्रण आहे का? असा सवाल उपस्थित केला होता.