दूध खरेदीसाठी नवे धोरण आणणार – महादेव जानकर

मुंबई : राज्यातील दूध, दूध पावडर आणि बटर निर्मिती संदर्भातील अडचणी दूर व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी दूधाच्या खरेदीचे नवे धोरण राज्य शासन आणणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

जानकर पुढे म्हणाले, राज्यात एक कोटी 34 लाख लिटर दूध निर्मिती होत असते यावर्षी सुमारे 20 लाख लिटर दूध अतिरिक्त झाले आहे. शासनाने 7 रुपये प्रतिलिटर ने दूध खरेदी केली आहे. जागतिक स्तरावर दुधाच्या भुकटीच्या किंमती कमी झाल्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत दूरगामी धोरण बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपरोक्त संदर्भातील लक्षवेधी सदस्य रामहरी रुपनवार यांनी उपस्थित केली होती.

You might also like
Comments
Loading...