‘तनुजासारखी आई बनण्याची..’ काजोल देवगणने केली इच्छा व्यक्त

kajol

मुंबई : कुछ कुछ होता है..सिनेमा आठवला की, काजोल डोळयांसमोर येते. आजवर अनेक सुपरहिट सिनेमा तिच्या नावे केले आहे. सेलिब्रिटी असून ही ती कुटूंबाला देखील तितकेच महत्व देते. तिच्या अभिनयासह कौटूंबिक जीवनात ती यशस्वी ठरली आहे.

दरम्यान अभिनेत्री काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट आईचा अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तनुजा फनी एक्सप्रेशन देताना दिसत असून त्या जीन्स टॉप घातला असून स्टोल घेतला एका खुर्चीवर बसल्या आहेत. हसत कॅमेराकडे पाहत आहे तर  बॅकग्राऊंडला ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाचे टायटल सॉन्ग वाजत आहे. या गाण्यावर त्या फनी एक्सप्रेशन देत आहेत. त्या बॉयकटमध्ये खूप आकर्षक दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर ‘आईसारखे कोणी नाही.’ बऱ्याच लोकांनी तनुजा ह्यांची स्तुती करत सुंदर, ब्यूटीफुल, अमेझिंग असेही लिहिले आहे. एका शोमध्ये पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती, यावेळी काजोलने सांगितले की, ‘तनुजासारखी आई बनण्याची माझी इच्छा आहे.’ तर तनिषाने सांगितले की,’माझ्या आईने आम्हाला शिकवलेला एक धडा म्हणजे कोणाकडून कधीही मदत न घेणे आणि स्वतःचा मार्ग शोधणे.’ अभिनेत्री तनुजा ह्यांनी आपल्या करियरची सुरुवात ‘देया नेया’ ह्या बंगाली चित्रपटापासून केली.  हिंदीत ‘हाथी मेरे साथी’, ‘मेरे जीवन साथी’ ,’चांद ओर सुरज’ हिट चित्रपटांसह मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या