चॅम्पियन ट्रॉफी सारखे भारताला पुन्हा हरवू; पाकिस्तानी खेळाडूने दिले आव्हान

hasan

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात टी २० वर्ल्ड कपची सुरुवात होत आहे. सुरुवातीचा सामना भारत-पाकिस्तान यांच्यात होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी हा बहुचर्चित सामना होणार आहे. भारत पाकिस्तान सामना दोन्ही देशात एका परंपरेप्रमाणे बघितला जातो. पाकिस्तानला आत्तापर्यंत एकही विश्वचषकात भारताला हरवण्यात यश आले नाही. सामना सुरु होण्याआधीच आता मात्र पाकिस्तानच्या खेळाडूंनी वाकयुद्ध सुरु केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी प्रमाणेच भारताला पुन्हा हरवू असे वक्तव्य पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीने केले आहे.

२०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत विरुद्ध अशी स्पर्धा झाली होती. ज्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या आशिया कप आणि विषवचषक सामन्यात मात्र भारताने पाकला धूर चारली होती. मात्र हसन अलीने चॅपियन्स ट्रॉफीचाच मुद्द्दा धरत भारतीय संघाला आव्हान दिले आहे. तो म्हणाला की ” जेव्हा आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती तो काळ आमच्यासाठी सर्वात चांगला होता. आम्ही टी ट्वेंटी विश्वचषकात भारताला पुन्हा हरवू. आम्ही सगळ्यात चांगले खेळाडू खेळवू.” भारत विरुद्ध पाकिस्तान सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक मानला जातो. दोन्ही देशाचे चाहते या लढतीसाठी उत्साही असतात.

विश्वचषकाआधी पाकिस्तानच्या कोच विकार युनिस आणि मिस्बाह उल हकने राजीनामा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे नवीन कोचेस कोण असतील याबाबत अजूनही घोषणा झालेली नाही. विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला एकही सामना जिंकू दिलेला नाही. भारतीय संघाला ही परंपरा कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे.

महत्त्वाच्या बातम्या :