वारकऱ्यांची असुविधा टाळण्यासाठी या शहरांत आजचा बंद नाही

टीम महारष्ट्र देशा :  गंगापूर येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने झालेला युवकाचा मृत्यू नंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, याच घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, पंढरपूरवरुन जाणाऱ्या वारकऱ्यांची असुविधा टाळण्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई आणि सातारा ही शहरे आजच्या बंदमधून वगळण्यात आली आहे.

आज बंद पाळला जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

आजच्या महाराष्ट्र बंद शांततेत पाळण्याच आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आल आहे, तसेच परिवहन सेवा ॲम्बुलन्स आणि अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आलेलं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणता ठोस निर्णय न घेतल्यास, हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

मराठा आरक्षण : ठाण्यात बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ

काकासाहेबाला वाचवता आलं असत मात्र निवेदन देऊन प्रशासनाचा काना डोळा

You might also like
Comments
Loading...