अपघात टाळण्यासाठी रेल्वे रुळांजवळ तारेचे कुंपण

indian railway

टीम महाराष्ट्र देशा –  रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने प्रशासनाने रेल्वे रुळांजवळ तारेचे कुंपण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून सुरुवातीला सहा ठिकाणी अशा पद्धतीने कुंपणे बांधण्यात येणार आहे. सध्या अशा प्रकारची कुंपणे ठाणे ते ऐरोली, चिंचपोकळी ते करी रोड आणि परळ ते दादर या दरम्यान एकूण 6 ठिकाणी कुंपणे बांधण्यात येत आहेत

Loading...

. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर दरवर्षी सुमारे तीन हजार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो, तर तितकेच प्रवासी जखमी होतात. रेल्वे रुळ ओलांडण्यास आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने तारांची कुंपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी-3 अंतर्गत 551 कोटी रुपये खर्चून वेगवेगळे उपाय केले आहेत. त्यात पादचारी पूल, संरक्षक भिंती, रेल्वे रुळांशेजारी कुंपणे बांधली जात आहेत. या पद्धतीच्या कुंपणांमुळे रुळ ओलांडणाऱ्यांच्या प्रमाणात घट होईल, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...