मुंबई : आयपीएल २०२२ संपल्यानंतर आता तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL 2022) सुरू झाली आहे. लीगचे गतविजेते चेपॉक सुपर गिलिस आणि नेल्लई रॉयल किंग्ज यांच्यातील पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. सामना बरोबरीत संपला, जो सुपर ओव्हरमध्ये रॉयल किंग्जने जिंकला. सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी रॉयल संघाला १० धावांची गरज होती. या संघाने १ चेंडू राखून आव्हान पूर्ण केले. तत्पूर्वी चेपॉक सुपर गिलीस संघासमोर १८५ धावांचे लक्ष्य होते. शेवटच्या चेंडूवर संघाला विजयासाठी ५ धावांची गरज होती आणि चेपॉकचा फलंदाज एस हरीश कुमारने चौकार मारून सामना बरोबरीत सोडवला.
जेव्हा चेपॉक संघ १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता, तेव्हा संघाचा फलंदाज एन जगदीशन याच्यासोबत असे काही घडले की, त्याने मैदानात लाजिरवाणे कृत्य केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेपॉकसाठी एन जगदीशन आणि कर्णधार कौशिक गांधी यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात फक्त ५ धावा आल्या. पण, दुसऱ्याच षटकात लागोपाठ दोन चौकार मारून जगदीशनने आपला इरादा व्यक्त केला होता. पुढच्याच षटकात जगदीशनने पुन्हा दोन चौकार मारून संघाची धावसंख्या ३ षटकांत २९ धावांवर नेली.
🤐🤐🤐🤐 @Jagadeesan_200 @aparajithbaba senior players of tn🤐🤐🤐 pic.twitter.com/C9orMqRPL3
— Jayaselvaa ᅠ (@jayaselvaa1) June 23, 2022
चौथ्या षटकात बाबा अपराजितने गोलंदाजी केली. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला जगदीशन आधीच क्रीजमधून बाहेर पडला. बाबा अपराजितने त्याला मंकडींग पद्धतीने धावचीत केले आणि अशा प्रकारे जगदीशनची धडाकेबाज खेळी संपुष्टात आली. जगदीशनला अशाप्रकारे बाद होणे पचवता आले नाही आणि मैदानातून डगआऊटच्या दिशेने परतत असताना त्याने रॉयल किंग्जच्या खेळाडूंकडे अश्लील हावभाव केले, जे कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटू शकले नाहीत. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –