fbpx

अमित शहांच्या हत्त्येसाठी तृणमूलने बांगलादेशी मारेकऱ्यांना बोलावले; अवधूत वाघ यांचा गंभीर आरोप

टीम महाराष्ट्र देशा : मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा पाहयला मिळाला. तसेच शहा यांची रॅलीसुरु झाल्यानंतर ट्रकवर काठ्या भिरकावल्याने वातावरण तापले होते, यावेळी तुफान दगडफेकही करण्यात आली.

या सर्व प्रकरणावर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ‘अमित शाह यांची हत्या करण्याचा तृणमूल काँग्रेस चा प्रयत्न होता’ असा आरोप केला आहे. तर ‘रोड शो दरम्यान गोंधळ उडवून शॉर्ट रेंज वरून पिस्तुल झाडून अमित जी यांची हत्या करण्यासाठी बांगलादेशी मारेकऱ्यांना खास बोलावून घेण्यात आले होते’ अशा आशयाच ट्वीट अवधूत वाघ यांनी केले आहे.