मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत ४० आमदारांसह मोठा बंड केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती तोडावी, तसेच भाजपसोबत युती करावी, अशी मागणी बंडादरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पूर्ण शिवसेना (Shiv Sena) हायजॅक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत भागिदार झालेले एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी भाजपच्या त्रासाला कंटाळुन भर व्यासपिठावर जनतेच्या समक्ष आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.
२०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. काही दिवस सरकार चालल्यानंतर भाजप आणि सेनेचे खटके उडायला लागले. भाजपवर शिवसैनिक नाराज होते. उद्धव ठाकरेंनी देखील ही नाराजी बोलून दाखवली होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बॉसिंग करायचे आणि शिवसेनेला दुय्यम लेखायचे, असा आरोप तेव्हाच्या शिवसेना मंत्र्यांनी केला होता. याबाबत पहिला आवाज एकनाथ शिंदे यांनी उठवला होता. कल्याण-डोंबिवलीतील सभेत जाहीरपणे त्यांनी भाषण करून दडपशाहीच्या, हुकूमशाहीच्या राजवटीत मी मंत्री राहू शकत नाही, असे सांगत स्टेजवरच उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, या प्रकरणाला शिवसेना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी देखील दुजोरा दिला आहे.
एकनाथ शिंदेंची भूमिका बदलली?
दरम्यान त्याच भाजपसोबत एकनाथ शिंदे सध्या सत्तेत आहेत. आता ते शिवसेनेवर टीका करत आहेत. २०१४ मध्ये जी एकनाथ शिंदेची भूमिका होती. तीच भूमिका शिवसेनेची आजही आहे. त्यामुळ एकनाथ शिंदे यांनी भूमिका बदलून भाजपसोबच यूती केल्याचा आरोप होत आहे.
राजीनामा देताना काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी सभेत राजीनामा दिला होता. “भाजपकडून कार्यकर्त्यावर अत्याच्यार होत असतील तर उघड्या डोळ्यांनी मी पाहू शकत नाही. मी भाजपच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. मी कॅबिनेटमध्ये बसू शकत नाही. कारण मी उघड्या डोळ्यांनी होणारे अत्याचार पाहत आहे, हे मी नाही पाहू शकत. मी प्रथम शिवसैनिक आहे. नंतर मंत्री आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि भावणा मला माहित आहेत. म्हणून मी आज माझ्या मंत्रिपदाचा, माझ्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देत आहे.” एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शेअर केला आहे. विसर न व्हावा, असे कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिले आहे.
मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे भाजपसोबत?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत युती केल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंची युतीसाठी प्रस्ताव आणल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदेना काँग्रेस-राष्ट्रवादी चालणार होती का?, असा प्रश्न विनायक राऊत यांनी उप्सथित केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेत असताना ३६ चा आकडा होता मग आता शिंदे हींदुत्वासाठी नाही तर मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर एकनाथ शिंदेंना हींदुत्वाची काळजी होती तर त्यांनी भाजपसोबत जाण्यासाठी अडीच वर्षाची वाट का पाहीली, असा प्रश्न निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivpratap Garudjhep Premium | शरद पवार यांनी केले अमोल कोल्हेंचे कौतुक! म्हणाले…
- Eknath Khadse | एकनाथ खडसेंनी ‘तो’ दावा फेटाळताच गिरीश महाजनांनी पुरावे देण्याचा दिला इशारा, म्हणाले…
- Jio Update | 5G नेटवर्क फोन नंतर Jio आता लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत
- Sharad Pawar | दसरा मेळाव्याच्या वादावरुन शरद पवारांनी एकनाथ शिंदेंसह उद्धव ठाकरेंना देखील सुनावलं, म्हणाले…
- Chandrashekhar Bawankule । अजितदादांनी सत्तेत येण्याचं स्वप्न बघू नये ; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला