fbpx

जाणून घ्या : गरम पाणी पिण्याचे फायदे

टीम महाराष्ट्र देशा : उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये गरम पाणी पिणे अतिशय आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. गरम पाणी पिण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत असे आपण नेहमी वाचतो. पण ते नेमके फायदे कोणते आहेत. ते आज आपण पाहूया.

गरम पाणी पिण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

थंड पाणी आपली तहान भागवत आहे तरी गरम पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. गरम पाणी आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवत. गरम पाणी पिताना ते कोमात करून प्यावे. तसचं पाणी एक एक घोट प्यावं. एकदम पाणी पिणं टाळावं.

गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. दररोज सकाळी रिकामी पोटी आणि रात्री जेवण केल्यानंतर एका तासाने गरम पाणी प्यावे. यामुळे कफ, पोटाचे विकार दूर होतात. जर त्वचेचे कोणतेही आजार असतील तर नियमित गरम पाणी प्यायल्याने विकार कमी होण्यास मदत होते.

गरम पाणी पिण्याचा मुख्य फायदा म्हणजे गरम पाणी नियमित प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गरम पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या