fbpx

सुंदर आणि निरोगी केसांसाठी करा ‘हे’ उपाय

टीम महाराष्ट्र देशा : केसांची काळजी घेणे किती महत्वाचे आहे, हे रोजचे गळलेले केस पाहून लगेच लक्षात येते. पण अशी अवस्था टाळायची असेल तर खरच केसांची काळजी घ्यायला हवी. धुतलेले केस घट्ट बांधल्यामुळे केस गळण्याची शक्यता अधिक असते.

यामुळे धुतलेले केस पूर्णपणे वाहून द्या मग त्यांना बांधा. केस दिवसातून दोन वेळा विंचरावेत. याने रक्तभिसरण सुधारते आणि केस वाढायला मदत होते. याच प्रमाणे केसांना सारखे तेल लावावे. त्यामुळे केसांचा चिकटपणा कमी होतो. तसेच तेल लावल्यावर स्वच्छ धुणंही महत्वाचे असते.

कोरफडीच्या जेलने केसांची मसाज केल्याने सुद्धा केस गळतीवर नियंत्रण मिळवता येते. त्याचप्रमाणे निर्जीव दिसणाऱ्या केसांना पोषण मिळते. नारळाचं दुध केसांना पोषण देते. याने केस गळतीवर नियंत्रण मिळवता येते. नारळाच्या दुधाने केस मऊ होतात.

जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर संत्री सोलून त्याचा गर केसांना लावा. केसांनमधील कोंडा दूर करण्यासाठी कांदा वाटून त्याचा रस डोक्याला लावल्यास कोंडा काही दिवसांमध्येच दूर होईल.

महत्वाच्या बातम्या