विरूष्काच्या मुली ऐवजी तैमूरच आला चर्चेत; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

TAIMUR

मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन झालं आहे. विराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली आहे. ‘आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे’ असं आवाहन देखील त्याने केलं आहे.

अनुष्का आई झाल्याची बातमी व्हायरल झाली आणि काहीच क्षणात करिना कपूर व सैफ अली खानचा मुलगा तैमूर अचानक चर्चेत आला. त्याच्यावरचे एक ना अनेक मीम्स व्हायरल झालेत. आता तैमूर नाही तर विरूष्काच्या मुलीची अधिक चर्चा होईल, असे म्हणत नेटक-यांनी मजेदार मीम्स शेअर केलेआहेत.

तैमूर आता 4 वर्षांचा झालाय. जन्मापासूनच तो जाम चर्चेत आहे. अगदी तो दिसला रे दिसला की फोटोग्राफर्सचे कॅमेरे त्याच्याकडे वळतात. क्षणात त्याचे फोटो व्हायरल होतात. बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय स्टारकिड म्हणून तो ओळखला जातो. पण आता विराट व अनुष्काच्या मुलीच्या रूपात बॉलिवूड स्टार्सकिड्सच्या यादीत आणखी एक भर पडली आहे. आता यामुळे तैमूरची लोकप्रियता घटते की वाढते, ते बघूच. तोपर्यंत तैमूरवरचे हे फनी मीम्स एकदा पाहाच.

महत्वाच्या बातम्या