शिवसेनेला पीक विमा मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही : सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. बुधवारी 17 जुलैला शिवसेनेना पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार आहे. अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावर राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शिवसेनला मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही. कारण पीक विम्याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

येत्या 17 जुलैला पिकविमा कंपन्यांविरोधात शिवसेना वांद्रे कुर्ला संकुलात इशारा मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा शेतकऱ्यांंचा नसून शेतकऱ्यांंसाठी  असणार आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले होते.

इतकेच नव्हे तर हा मोर्चा एका कंपनीवर जाईल केवळ प्रतीक म्हणून, बाकी कंपन्यांवर आमची शिष्टमंडळे जातील, असेही त्यांनी म्हंटले. तसेच जर विमा कंपन्यांना सरकारी भाषा कळत नसेल तर शिवसेना आमच्या भाषेत समजावेल. पिकविमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातील सगळी प्रकरणे निकाली काढावीत असेही ठाकरे यांनी म्हंटले.