लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

परळी,बीड : सध्या बदलेल्या परिस्थितीमध्ये पत्रकारांनी लेखणीतून क्रांती करण्याची वेळ आली आहे. शनिवारी परळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्त साधून आयोजित  कार्यक्रमात मुंडे बोलत होते. पत्रकारांनी निर्भीडपाने आपली लेखणी चालवून सामान्यांना न्याय द्यावा. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष असो त्यांच्या चुकांवर बोट दाखवून पत्रकारांनी बातमीदारी करावी. देशात पत्रकार, विचारवंत, लेखकांचे जिवन असुरक्षीत झाले असून अशावेळी वातावरण अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ येवून ठेपली आहे.

यावेळी रिपाई चे राज्य उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, पत्रकार रामप्रसाद शर्मा, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, जी.एस.सौंदळे हे पस्थिती होते. या कार्यक्रमात पत्रकार रामप्रसाद शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे निमंत्रक मोहन व्हावळे, ज्ञानोबा सुरवसे, माजी तालुका अध्यक्ष प्रेमनाथ कदम, धनंजय आढाव, किरण धोंड, शंकर इंगळे, बाजीराव काळे, परळी कुस्तीगीर परिषदचे तालुका अध्यक्ष मुरलीधर मुंडे, अमोल सुर्यवंशी, अशोक मुंडे, गणेश आदोडे, प्रा. दशरथ रोडे, अमोल सुर्यवंशी, चंद्रमणी वाघमारे, सुमंत गिरी, एन.के. वडगावकर,जगन्नाथ सुर्यकर, माजी न.प.सभापती ओमप्रकाश सारडा. सर्व पत्रकारांची उपस्थित होती.

 

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...