कोरोना आणि लॉकडाउनमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ; कलाकार महासंघाचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन

सातारा : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन चर्चा करून देखील यावर तोडगा निघाला नसल्याने सरकारला इशारा म्हणून कलाकार महासंघाच्यावतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत नुकसान भरपाई जमा न केल्यास पुढील काळात विधान भवनावर आक्रोश आंदोलन करू असा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी राज्याध्यक्ष अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष रामचंद्र जाधव यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी आंदोलन करत असताना मास्क न लावल्याने सातारा शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत कारवाई केली.

पहा व्हिडिओ :

कोरोना आणि लॉकडाउनमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ

कोरोना आणि लॉकडाउनमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ; कलाकार महासंघाचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन#LockdownMaharashtra #Coronavirus

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Wednesday, September 16, 2020

महत्वाच्या बातम्या :