औरंगाबाद: दुखवट्यात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणाच्या निर्णयानंतर राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून नियुक्ती होईल. जे कर्मचारी कर्तव्यावर रुजू आहेत. त्यांचा विलीनीकरणानंतर विचार केला जाणार नाही. अशी माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratna Sadavarte) यांनी औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांना दिली. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. कर्तव्यावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा दुखवट्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि.१७) अॅड. सदावर्ते यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
७ नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. संपात फूट पडत गेल्यानंतर अनेक कर्मचारी रुजू झाले आहेत. मात्र अजूनही अनेक कर्मचारी दुखवट्यावर ठाम आहेत. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी दुखवट्यावर आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरच आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
आजपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात संपातून माघार घेऊन ९०० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र इतर कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील आगारात प्रातिनिधिक स्वरूपात मोजकेच कर्मचारी दुखवटा पाळण्यासाठी बसलेले आहेत. सोमवारी (दि.१७) औरंगाबाद जिल्ह्यात १३९ बसेसच्या ४२१ फेऱ्या झाल्या. यातून ४०४५ प्रवाशांनी प्रवास केला. जिल्ह्यात जालना, बीड, गेवराई, तुळजापूर, लातूर, वैजापूर, गंगापूर आदी ठिकाणी बसेस धावल्या.
महत्त्वाच्या बातम्या
“मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणे”, बावनकुळेंचा पटोलेंवर हल्लाबोल
पहिल्या भेटीतच ऐश्वर्याला आवडला होता धनुष; जाणून घ्या त्यांची हटके लव्हस्टोरी
पहिल्या भेटीतच ऐश्वर्याला आवडला होता धनुष; जाणून घ्या त्यांची हटके लव्हस्टोरी
पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा; गडकरींची मागणी