fbpx

कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ सापडला टाईम बॉम्ब, जनतेत दहशतीचे वातावरण

टीम महाराष्ट्र देशा :  राजधानी मुंबई स्थित जगप्रसिद्ध सिद्धी विनायक गणेश मंदिर दहशतवादाच्या निशाण्यावर आहे असा फेक मेसेज प्रेयसीला बदनाम करण्याकरिता प्रियकराने लिहलेला असतानाच आता खरोखरचा कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे.

कळंबोलीतील सुधागड शाळेसमोरील प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला असून बॉम्ब नष्ट करण्यासाठी तपास यंत्रणांमार्फत शिताफीने प्रयत्न चालू झाला आहे व मुंबई पोलीस पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटना स्थळी दाखल झाले आहेत.