आज रात्रीपर्यंत मुख्यमंत्री भाजपचाच होणार : नवनीत राणा

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच काही काही केल्या सुटण्याचे नाव घेत नाही. अशातच अमरावती लोकसभा क्षेत्राच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजप ला पाठींबा दर्शविला आहे. राज्याच्या राजकारणात हालचाल कितीही झाली तरी आज रात्रीपर्यंत मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे वक्तव्य राणा यांनी केले आहे.

नवनीत राणा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच पाठींब्यावर खासदार झाल्या. मात्र नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दर्शविले. अपक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी भाजप मध्ये त्यांनी प्रवेश केला. आता विधानसभा निकालाच्या १८ दिवसानंतर देखील महाराष्ट्रात सत्ता स्थ्पानेचा संघर्ष सुरूच होता. पण शेवटी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठींबा देऊन राज्यात महाशिवआघाडी सत्ता स्थापन होत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करेल काय, याकडे सर्वांचं लक्ष होत. राज्यपालांनी दिलेली मुदत वाढवून मागण्यासाठी शिवसेनेचे नेते राज्यपाल भवनावर गेले होते. मात्र अखेरच्या क्षणाला कॉंग्रेसने पाठींबा देण्यास नकार दिल्याने शिवसेनेची देखील कोंडी वाढली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला बहुमत सिध्द करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ७:३० पर्यंत मुदत दिली होती. याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबई तसंच दिल्लीत बैठका सुरू होत्या. आता शिवसेनेलाही बहुमत सिध्द न करता आल्यामुळे भाजपची भूमिका काय असेल,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :