ख्रिसमस आणि नववर्ष सेलिब्रेशन होणार धूम धडाक्यात, पब आणि बार पहाटेपर्यंत राहणार खुले

२४, २५ आणि ३१ डिसेंबरला पब, हॉटेल्स आणि बार राहणार पहाटेपर्यंत चालू

टीम महाराष्ट्र देशा: नववर्ष आणि नाताळच्या पूर्वसंध्येला पब आणि हॉटेल्स पहाटेपर्यंत चालू राहणार आहेत. या संदर्भात गृह खाते आणि एक्साएज खाते यांच्यात यासंदर्भात बैठक झाली आणि त्यानंतर गृह खात्याने यासंदर्भात एक परिपत्रक काढत पब आणि हॉटेल्स पहाटे ५ वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजेपर्यंत बार उघडे राहणार आहेत. त्याचबरोबर वाएंन्स शॉपसला रात्री १ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

वर्ष अखेरीस प्रत्येकाला जल्लोष करायचा असतो, त्यामुळे आम्ही ही मुदतवाढ दिली आहे. यामुळे मुंबईला एक पर्यटनस्थळ म्हणूनही चालना मिळते. या दिवशी पोलिसांना अतिरिक्त कुमक ठेवण्याची विनंती करण्यात आली असल्याची माहिती आहे.

वेळेत वाढ करण्यात आली असली, तरी बार आणि पब चालकांना अद्याप पोलिसांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पोलिस महासंचालकांना यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या अध्यक्षांनी दिली आहे.