टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला- विखे पाटील

पुणे : पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाषणादरम्यान जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. टिळक आम्हाला जवळचे असल्याचं म्हणत साईबाबा यांचा सत्कार शिर्डीला टिळकांनी 2011 साली केला. विखे पाटील असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

२०११ चा उल्लेख :
निमित्त होतं टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान समारंभाचं…. टिळक आम्हाला जवळचे असे सांगताना, ‘साईबाबा यांचा सत्कार शिर्डीला टिळकांनी २०११ साली केला’ असं त्यांनी म्हटलं.

चुकीची दुरूस्ती :
२०११ चा उल्लेख २ वेळा केल्यानं हशा पिकला. त्यावर आपली चूक सुधारत हा सत्कार १९१० ला झाला अशी दुरुस्ती त्यांनी केली.

आठवण लोकमान्यांची…