आधी अजितदादांच्या मांडीला मांडी, नंतर शिवस्वराज्य यात्रेचे काढले वाभाडे

 टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जनतेच्यावतीने सरकारला काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत. मात्र याच शिवस्वराज्य यात्रेत एका संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना उलट सवाल केले आहेत. साखर कारखान्यांच्या थकीत बीलावरून संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी हे सवाल विचारले आहेत.

संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी हे सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूरचे खा. अमोल कोल्हे यांना विचारले आहेत.डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत भाषण करत असतात. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश शिवछत्रपती सैन्याला देतात. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे असलेले साखर कारखाने गोरगरीब शेतकऱ्यांची बीलं देत नाहीत. हीच का मग तुमची ‘शिवस्वराज्य यात्रा’? असा प्रश्न टिळक भोस यांनी विचारला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात मात्र शेतकऱ्यांच्या उसाचे बील राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप पाटील चेरमन कुकडी सहकारी साखर कारखाना हे देत नाहीत. यावरून टिळक भोस यांनी अजित पवार आणि अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे टिळक भोस हे शिवस्वराज्य यात्रेत मांडीला मांडी लावून मंचावर बसले होते. त्यानंतर टिळक भोस यांनी अजित पवार आणि खा. अमोल कोल्हे यांना न्यायाचे प्रश्न विचारले.

#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता’

 

‘महाडेश्वर जनाची नाही किमान मनाची लाज बाळगून महापौरपदाचा राजीनामा द्या’

 

हि राजकीय कुरघोडीची वेळ नाही, सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल – मुख्यमंत्री