टिळकांचा मानाचा पाचवा गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदाही  पारंपारिक पालखीतूनच

पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. स्वतंत्र भारताची भावना जागृत करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हे मंडळ १८९३ साली स्थापन केले. मिरवणुकीत बिडवे बंधूंचे सनईचौघडा वादन, श्रीराम पथक व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकही मिरवणुकीत असणार आहे.

You might also like
Comments
Loading...