मुंबई : आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या ‘गोलीगत’ आणि ‘बुक्कीत टेंगुळ’ या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक (Tiktok) फेम सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता मराठी चित्रपटात झळकणार आहे.
सोशल मीडियावर (Social Media) सूरज चव्हाणचे लाखों चाहते आहेत. त्यांच्या ‘बुक्कीत टेंगूळ’ या डायलॉगने तर पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. आता हाच सुरज त्याच्या चाहत्यांसमोर थेट हिरो म्हणून झळकणार आहे. आजवर त्याच्या प्रसिद्ध डायलॉगने तो सर्वांचे मनोरंजन केले आहे. आता तो चक्क सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे (Prashant Shingate) निर्मित ‘का रं देवा’ या आगामी मराठी चित्रपटातून झळकणार आहे.
सूरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी असून त्याचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. लहानपणापासूनच तो बोबडा बोलतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग आहे. मात्र त्याचे व्यंगच त्याचे बलस्थान ठरले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले. विशेष म्हणजे नवोदित कलाकारांच्या प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यांनी सुरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. या चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागल, मयूर लाड, अभिनेते जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या भूमिका आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता सूरजच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
औरंगाबादेत अॅण्टिजेन, आरटीपीसीआर तपासणी न करणाऱ्या १५ खासगी प्रयोग शाळांना नोटिसा!
-
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “प्रत्येकाने…”
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<