Mumbai- मुंबईसह महत्त्वाच्या तीन विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली

देशभरात मुंबईसह महत्त्वाच्या तीन विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विमान अपहरणाची शक्यता वर्तवणारा ई – मेल आल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली. एका महिलेनं पाठवलेल्या या ई – मेलमध्ये सहा तरूण विमान अपहरणाबाबत चर्चा करत असल्याचं, म्हटलं आहे. या ई मेलनंतर मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आल्या.

 

ई-मेलमधील मजकूर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व गुप्तचर संस्थांना काल रात्रीच दिला आहे. त्यानंतर विमानतळाशी संबंधितांची बैठक घेण्यात आली. आज सकाळपासूनच तीन विमानतळांवर घातपातविरोधी मोहिमा राबवण्यात आल्या.

 

प्रवासी, त्यांचे सामान अशा अनेक गोष्टींची बारीक तपासणी करण्यात आली. सीआयएसएफने स्निफर डॉग्जही सेवेत आणले व सॅनिटेशन ड्रिससाठी कमांडो पथके आली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की असे असले तरी घाबरण्याचे कारण नाही कारण सर्व कामकाज सुरळीत चालू आहे. प्रवाशांना कुठल्या अडचणी आलेल्या नाहीत. चेन्नई देशी व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुरक्षा कडक केली होती. तेथे तरीही विमान वाहतूक सुरळात होती. पोलीस तो ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.