महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात

टीम महाराष्ट्र देशा : आज महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकी पोलिसांच्या अरेरावीला सामोरं जावं लागलं होत. बेळगावात हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी गेलेल्या राजेंद्र यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतल होतं. आता शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून राऊत  यांनी ते स्वत: बेळगावला जाणार असल्याची घोषणा ट्वीटरद्वारे  केली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. संजय राऊत ट्वीटमघ्ये म्हणाले , “महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांची धक्काबुक्की. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखले. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? मी उद्या बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय. जय महाराष्ट्र”

Loading...

या ट्विटमधून  संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपलाही लक्ष केलं. दरम्यान संजय राऊत यांनी उद्याच बेळगावला जाण्याची घोषणा केल्याने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

 

आज दुपारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सीमाभागातील बेळगावमध्ये  संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम १७ जानेवारीला आयोजित केला जातो.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आज शुक्रवारी बेळगावला पोहोचले होते. परंतु, हुतात्मा चौक येथील कार्यक्रमात यड्रावकरांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले.

यावेळी यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला. यड्रावकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी कुणाचंही ऐकून घेतलं नाही आणि थेट यड्रावकर यांना ताब्यात घेतलं.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा परिचय-

राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्यसरकारमध्ये राज्यमंत्री असून त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्यमंत्री ही खाती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे आहेत. ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण