‘वाघाशी मैत्री होत नाही, कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.‘उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत,’ असं विधान करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ‘युती’चे संकेत दिलेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज उत्तर दिले आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.’

तर १८ महिन्यांपूर्वी आमचं सरकार आलं असतं
‘दोन मोठ्या माणसाच्या भेटीत काय घडलं असले हे सांगता येणार नाही. वाघाची दुश्मनी आमची कधीच नव्हती. त्यांची जुनी मैत्री ही मोदींशी आहे. फडणवीस आणि पाटलांशी त्यांचं पटत नाही. जर आमच्याशी मैत्री असती तर १८ महिन्यांपूर्वी आमचं सरकार आलं असतं,’ अशी सल चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या